दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन, ‘दि सारी स्टोरी’सह सई बनली उद्योजिका !!

अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलीवूड, आणि फॅशनविश्व  गाजवल्यावर आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अजून एका विश्वात पाऊल ठेवलं आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे. 
सई ताम्हणकरने आजवर अनेक यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. मग ते मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूड आणि फॅशन दुनियेत तिने कमावलेलं नाव असेल किंवा स्वत:ची एक कुस्ती टिम असणं. सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय. आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. अनेकजणी सईला आपली ‘रोल मॉडेल’ मानतात. सईच्या चाहत्यांना ह्यानिमीत्ताने सईच्या निवडीच्या साड्या नेसण्याचा मौका चालून आलाय.

आपली कॉलेजपासूनची मैत्रीण श्रुती भोसले-चव्हाणसोबत सईने हे लेबल लाँच केले आहे. सई ताम्हणकर म्हणते, “कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण दोघी मिळून काहीतरी नवीन करूया, असं मला आणि श्रुतीला नेहमी वाटत असे. पण काय नवं ते उमजतं नव्हतं. पूढे आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात करीयर करण्यात गुंतून गेलो. पण 2020 ने आम्हांला नव्या कल्पनांवर विचार करायची संधी दिली. आणि आता  ‘दि सारी स्टोरी’ने आमचं स्वप्न आकाराला येतंय.”
‘दि सारी स्टोरी’मध्ये ‘सई टच’ काय असेल असं विचारल्यावर सई सांगते, “माझ्या सिनेमा आणि भूमिकांबाबत जशी मी चोखंदळ आहे ना, अगदी तशीच साड्यांबाबतही आहे. प्रत्येक साडीचा पोत, रंग, डिझाइन ह्यावर माझं आणि श्रुतीचं बारकाईने लक्ष असणार आहे. जसे माझ्या प्रत्येक चित्रपटाला एक कथानक असते. तसेच आमच्या लेबलची साडीही एखादी गोष्ट उलगडावी तशीच सुरेख असेल.”


‘दि सारी स्टोरी’ची प्रेरणा कशी मिळाली ह्याविषयी श्रुती भोसले-चव्हाण सांगते, “माझ्या आईकडे साड्यांचे मोठे कलेक्शन आहे. भारतातल्या कानाकोप-यात मिळणा-या प्रत्येक प्रकारातल्या साड्या तिच्याकडे आहेत. आईची ही साड्यांची आवड लहानपणापासून माझ्यात रूजत गेली. आणि आता त्याचीच परिणिती आहे ‘दि सारी स्टोरी’. “
भारताला लाभलेली साड्यांची समृध्द परंपरा जपत, प्रत्येक वयोगटातील, क्षेत्रातील स्त्रियांना आवडतील, शोभतील, अशा रंगांच्या, डिझाइनच्या साड्या ‘दि सारी स्टोरी’मध्ये असतील.  श्रुती ह्याविषयी सांगते, “साडी कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या सण-समारंभांना साडी नेसण्याकडे जगभरातल्या अगदी 18 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षांच्या आजींपर्यंत प्रत्येक स्त्रीचा कल असतो. म्हणूनच ‘दि सारी स्टोरी’मध्ये 30हून अधिक वैविध्यपूर्ण प्रकारातल्या साड्या तुम्हांला मिळतील.”

https://www.instagram.com/p/CGwYZajji3W/?igshid=1xfcqxb7fu1so
https://www.instagram.com/thesareestory.in/?igshid=sowsoa847l8f

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *