दुसऱ्या ‘ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हल’चे आयोजन

एसजीआर नॉलेज फाऊंडेशनतर्फे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान आयोजन

पुणे : एसजीआर नॉलेज फाऊंडेशनच्या वतीने दुसऱ्या ‘ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव २७, २८, २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. महोत्सवामध्ये साहित्य आणि जीवन या विषयांवर निरनिराळ्या पध्दतीने उहापोह करण्यात येणार आहे. विविध विषयातील लेखकांचे अनुभव ऐकण्याची सुवर्ण संधी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.
‘ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन २७ नोव्हेंबरला होणार आहे. महोत्सवात विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. सुप्रसिद्ध लेखक शिव खेरा, जोनो लीनीन, नवीन चौधरी, संजय बारू, शांतनू गुप्ता, तनुश्री पोडर यासह विविध क्षेत्रातील अनेक नावाजलेले लेखक यात सहभागी होणार आहेत. महोत्सवात होणाऱ्या विविध सत्रांमध्ये व्यक्तिगत विकास, साक्षात्कार, चर्चा आणि पुस्तक विमोचन आदी कार्यक्रम होतील. महोत्सवात दिवसभर विविध कार्यक्रम होताल तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २९ नोव्हेंबरला ओपन माईक, म्युझिकल इव्हेंट आणि विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महोत्सव सर्वांसाठी निशुल्क असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी https://oclfnagpur.com/registration या संकेत स्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ७८८७८६०१०७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *