नीता ढमालेंच्या उमेदवारीने बदलली पुणे पदवीधरची राजकीय समीकरणे

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे पदवीधरसाठी इच्छुक असणाऱ्या नीता ढमालेंना ऐनवेळी डावलण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उमेदवारीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नीता ढमाले यांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपमधील बड्या नेत्यांशी चांगले हितसंबंध आहेत. गेल्या वर्षभरापासून नीता ढमाले पदवीधर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवार निश्चित होण्याआधीच नीता ढमालेंनी झंझावाती प्रचार करुन मतदारसंघ पिंजून काढला आहे.

गतवेळी कोल्हापूर-सातारा-सांगली या जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यावेळी पुणे जिल्ह्यात उमेदवारी मिळेल याची दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना अपेक्षा होत्या. मात्र दोन्ही पक्षांनी सांगली जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी दिल्याने पुणे जिल्ह्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सर्वाधिक पदवीधर मतदारसंख्या असलेल्या पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नाराजी दोन्ही पक्षांना अडचणीची ठरणार असून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या नीता ढमाले पदवीधरच्या निवडणुकीत बाजी मारु शकतात राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *