पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी महेश म्हस्के यांचा निवडणूक जिंकण्याचा निर्धार

पुणे, दि. 21 नोव्हेंबर: पदवीधरांना बेरोजगार भत्ता मिळावा, सरकारी नोकरभरतीची माहिती गावपातळीवरील पदवीधरांना कळावी तसेच विविध परीक्षांची केंद्रे गावपातळीवर तयार व्हावी यासाठी भरीव कामगिरी करण्यासाठी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार असल्याचे अपक्ष उमेदवार  महेश म्हस्के म्हणाले. कोणताही राजकिय वारसा नसताना व पैशाचे पाठबळ नसताना केवळ पदवीधरांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठीच हि निवडणूक लढविण्याचा निर्धार म्हस्के यांनी व्यक्त केला. सिव्हिल इंजिनिअर असलेले महेश मस्के हे पदवीधर निवडणूकित पहिल्यांदाच उभे राहिले आहेत.

महेश म्हस्के


पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधरांच्या कल्याणासाठी असून यामध्ये पक्षीय राजकारणाचा संबंध नाही. पदवीधरांसाठी विधायक कामे करता यावी, त्यांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा याकरिता निवडणूक लढवत आहे. सर्वसाधारण तरुणांना राजकारणात संधी मिळावी, त्यांचे भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी, शैक्षणीक धोरणात अमुलाग्र बदल घडवण्याची गरज आहे, यासाठी एक संधी बिगर राजकिय वारसा असलेल्या उमेदवाराला मिळण्याची आवश्यकता असल्याचे महेश म्हस्के म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *