‘महक’तर्फे रविवारी ‘मेरा साया साथ होगा’ची लाईव्ह मैफल

संगीतकार मदन मोहन यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन

पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कलाकारांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार भिंतीत आपण सगळे बंद असल्याने एकमेकांना भेटणे शक्य नाही. काम करणे शक्य नाही. भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होत जाणार आहे. नाट्यगृहे, सभागृहे कधी खुली होणार? कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ कधी मिळणार? त्यांची गुजराण कशी होणार? असे अनेक प्रश्न कलाकारांना सतावत आहेत.
दुसरीकडे कोरोनामुळे संपूर्ण जग व्हर्च्युअल होत आहे. अशा स्थितीत धीराने उभा राहत कलाकारांना आपल्यासमोर सादर होण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. त्यातूनच कलाकारांनी आता गायन-संगीत मैफलीही ऑनलाईन करण्यास सुरवात होत आहेत. त्यातील पहिला प्रयोग ‘मेरा साया साथ होगा’च्या लाईव्ह मैफलीतून रविवारी (दि. १२ जुलै) रंगणार आहे. ‘मेरा साया साथ होगा’, ‘लग जा गले’, ‘रस्म ए उल्फत’ अशा बहारदार गाण्यांना संगीतबद्ध करणाऱ्या मदन मोहन यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त गायिका मनीषा निश्चल यांच्या ‘महक’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे. 
मदन मोहनजी यांच्या स्मरणार्थ त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या काही निवडक गाण्यांची मैफल मनिषा निश्चल्स ‘महक’ प्रस्तुत व संदीप पंचवटकर निर्मित ‘मेरा साया साथ होगा’ हा पहिलावाहिला ऑनलाईन कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता होणार आहे. सईद खान, असिफ खान, हर्षद गनबोटे, असिफखान इनामदार यांच्या वाद्यवृंदाने, तर संदीप पंचवटकर यांच्या मधुर निवेदनाने ही मैफल रंगणार आहे. आ कार्यक्रम सशुल्क असून, www.showline.in या संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहे. 

“कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी आपण स्वतःसाठी, भेट करण्यासाठी किंवा जेष्ठ नागरिकांच्या मनोरंजासाठी या कार्यक्रमाचे तिकीट घेऊन सहकार्य करू शकता. तसेच कलाकारांना स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यासाठी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करावे.” – मनीषा निश्चल, गायिका व आयोजिका


कोरोनाच्या संकटामुळे कलाकारांवर बिकट परिस्थिती उद्भवली आहे. नाटक आणि संगीत कार्यक्रमाशी संबंधित कलाकारांना घेऊन खूप हिमतीने आणि अपेक्षेने ही सर्व कलाकार मंडळी हा ऑनलाईन कार्यक्रम सादर करणार आहे. मोबाईल, टॅब, लॅपटॉप, टीव्ही, प्रोजेक्टरच्या साहाय्याने ही मैफिल श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. प्रवेशिका घेणाऱ्या श्रोत्यांना लिंक दिली जाणार आहे. हा कार्यक्रम कलाकारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे, असे आयोजिका मनीषा निश्चल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *