झोपडपट्ट्यांतील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रकल्प दूतद्वारे औषध फवारणी

असंख्य झोपडपट्ट्या निर्जंतुकीसाठी औषध फवारणी … 

पुणे : ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाच प्रभाग आणि ५० पेक्षा अधिक झोपडपट्ट्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. विविध झोपडपट्ट्यांमधील गल्ली-बोळे, रस्ते, नाले, सार्वजनिक शौचालय इत्यादी ठिकाणी दर दोन दिवसांनी औषध फवारणी करून हा भाग निर्जंतुक करण्यात आला. जवळपास सहा लाख झोपडपट्टी निवासींना या उपक्रमाचा लाभ होऊन कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी  करण्यास मदत झाली.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यातील देह विक्री व्यवसाय चालवणारे बुधवार पेठ, शुक्रवार पेठ यातील सर्व भाग तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने औषध फवारणी करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि पर्सिस्टंट फाउंडेशन बरोबरच स्थानिक कार्यकर्त्यांनी खूप महत्वाची भूमिका पार पडली. जवळजवळ चारशे स्वयंसेवकांनी या कामी उत्स्फूर्तपणे योगदान दिले. दोन्ही संस्थांमार्फत या कामी आवश्यक असणारी सर्व साधन साहित्य पुरविण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा उद्देश हाच आहे की माणसे बाधित न होता लवकरात लवकर जगण्याची व्यवहार सामान्य व्हावेत, संक्रमण संपून कोरोना हद्दपार व्हावा.

  सामाजिक जबाबदारीचे भान असणारी आणि नाविन्यपूर्ण संशोधीत तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाच्या कळीच्या प्रश्नांवर काम करणारी पुण्याची ट्री इनोव्हेंटिव्ह फाउंडेशन आणि समाजाच्या गरजा ओळखून हाकेला कायम सकारात्मक प्रतिसाद देणारी पर्सिस्टंट कंपनीच्या सहयोगाने मे महिन्यापासून दूत निर्जंतुकीकरण प्रकल्प हा प्रभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *