पुणे विद्यार्थी गृहाच्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. घाटकोपर, नेरुळ शाखा, मुक्तांगण इंग्लिश स्कुल, महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, काकासाहेब देशमुख विद्यालय, पंचवटी, तळेगाव विद्याप्रशाला, काकासाहेब देवधर विद्यालय, विद्याभवन संकुलातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून १०० टक्के निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश स्कुलमधून ३७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ८९ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा जास्त, २९२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, ७३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर ११ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे. इशा खोब्रागडे (९७.६०%), गायत्री जाधव (९७.४०%), रुचिता देवधर (९६.६%) अनुक्रमे पहिली, दुसरी व तिसरी आली आहे. विद्याभवन येथील इंग्रजी व मराठी माध्यम शाळेतून परीक्षेस २७१ विद्यार्थी बसले. त्यातून विशेष योग्यता श्रेणीमध्ये १५८, प्रथम श्रेणीत ९७, द्वितीय श्रेणीत १५, तर उत्तीर्ण श्रेणी एक विद्यार्थी समाविष्ट आहे. 
इंग्रजी माध्यमात सई निमकर (९९.८०%), श्रावणी कारेकर (९८.२०%), जय गायकवाड (९७.४०%) यांनी, तर मराठी माध्यमात सनी महाबळे (९३.८०%), सलोनी शिगवण (९२%), सायली जाधव (९१.२०%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. सेमी इंग्रजी माध्यमात परीक्षेला १४६ विद्यार्थी बसले. त्यातून विशेष योग्यता श्रेणीत ११३, प्रथम श्रेणीत २९, तर द्वितीय श्रेणीत चार विद्यार्थी आले आहेत. स्वरांगी शिरसेकर (९५.४०%), मानसी आव्हाड (९२.६०%), रोहित पडवळ (९२.४०%) यांनी यश मिळवले. महाराष्ट्र विद्यालय 

पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *