अभियंता दिवसानिमित्त ‘मविप’तर्फे उद्या ‘महिला अभियंत्यांचे योगदान’वर परिसंवाद

पुणे : राष्ट्रीय अभियंता दिवसाचे औचित्य साधून ‘अभियांत्रिकीत महिला अभियंत्यांचे योगदान’वर परिसंवादाचे आयोजन केले आहे. उद्या  मंगळवारी (दि. १५) सायंकाळी ५.४५ वाजता झूममिटवर हा परिसंवाद होणार आहे. मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजिला आहे. भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीदिनी हा अभियंता दिवस साजरा केला जातो.

केंद्रीय जल आणि विद्युत अनुसंधान केंद्राच्या निवृत्त संचालकडॉ. वर्षा भोसेकर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता वैशाली आवटे या परिसंवादाचे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अभियंत्यांना ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी https://us02web.zoom.us/j/89269268520?pwd=blprUlQ3RUlneWNxMjE5cG1YeWd5QT09 या लिंकला भेट द्यावी व मिटिंग आयडी (८९२६९२६८५२०) आणि पासवर्डचा (८८४६४९) वापर करावा, असे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *